डब्ल्यूपीएल स्पर्धेत 8 फलंदाज अपयशी, कोण संपवणार शतकाची प्रतिक्षा? 

18  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकाही महिला फलंदाजाला शतक लगावता आलेलं नाही.

आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात एकूण 8 फलंदाजांनी 90 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. मात्र त्यापैकी एकालाही शतकापर्यंत पोहचता आलेलं नाही.

आरसीबीच्या स्मृती मंधानाचं नुकतंच शतक हुकलं. स्मृती 96 धावांवर बाद झाली.

स्मृती WPL 2026 स्पर्धेत 90 पार मजल मारुन शतक करण्यात अपयशी ठरणारी दुसरी फलंदाज आहे. स्मृतीआधी सोफी डिव्हाईन हीने 95 धावा केल्या.

डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या मोसमात (wpl 2025) बेथ मुनी, जॉर्जिया वॉल आणि मेग लेनिंग या तिघींनी 90 पार मजल मारलेली. मात्र त्यांना शतक करता आलं नाही.

हरमनप्रीत या स्पर्धेत 2024 मध्ये 95 धावांवर नाबाद राहिली. सोफी डिव्हाईन हीचं 2023 साली 1 धावेने शतक हुकलेलं. तर एलिसा हीसी 96 धावांवर नाबाद परतली होती. 

त्यामुळे आता सुरु असलेल्या चौथ्या हंगामात तरी स्पर्धेतील शतक करणारी पहिली फलंदाज मिळणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.