सलमान खान, ब्रेकअप आणि... ऐश्वर्या भडाभडा बोलली

9 june 2024

Created By :  Manasi Mande

सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकेकाळी यांची जोडी बॉलिवूडमध्ये प्रचंड गाजली.  

सिमी गरेवाल यांच्या शोमध्ये आलेल्या ऐश्वर्याने बरेच मोठे खुलासे केले.  

सलमान खानसोबत झालेल्या ब्रेकअपबद्दल तू कधीच बोलत नाहीस, असं का ? असा प्रश्न सिमी यांनी तिला विचारला.

माझ्या आयुष्यातील सलमानचा चॅप्टर संपला आहे, असं स्पष्ट उत्तर ऐश्वर्याने तेव्हा दिलं.

त्यामुळे आता मागे वळून त्या गोष्टींकडे पाहण्याची, ते आठवण्याची माझी इच्छा नाही.

मी भूतकाळ मागे सोडलाय आणि मूव्ह ऑन केलंय, असंही ऐश्वर्याने नमूद केलं.

मी एकटी नाही, माझ्यासोबत माझं कुटुंबही आहे. आणि ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहेत.

मी फक्त एक पब्लिक फिगर नाही, तर हाडामासांची एक नॉर्मल व्यक्ती, माणूसही आहे.

माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झालेला मला खचितच आवडणार नाही, असं ऐश्वर्याने स्पष्ट केलं.