इन्स्टाग्रामवरून कोट्यवधींची कमाई करणारी 'जेन झी' अभिनेत्री, फॉलोअर्स पाहून..

26 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

बालकलाकार म्हणून 'फुलवा' मालिकेत वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री.

जन्नत जुबैर आज सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

2001 मध्ये जन्मलेली जन्नत ही 'जेन झी' पिढीचे प्रतिनिधित्व करते.

इन्स्टाग्रामवरील पेड प्रमोशन्स आणि विविध ब्रँड्सच्या सहकार्यामुळे ती कमी वयातच कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.

तिच्या इन्स्टाग्रामवर तब्बल 5.1 कोटी फॉलोअर्स असून हा आकडा अनेक मोठ्या बॉलिवूड कलाकारांपेक्षाही अधिक आहे.