नेहा खानचा रॉयल मराठमोळा लूक पाहून चाहते घायाळ; सौंदर्याने वेधलं लक्ष

24 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

‘देवमाणूस’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नेहा खान आपल्या अभिनयासोबतच आकर्षक लूकसाठीही कायम चर्चेत असते.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या नेहाने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नेहाने डार्क मखमली मरून आणि हिरव्या रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन असलेली पारंपरिक साडी नेसली आहे.

नेहाने या लूकसोबत हातात पारंपरिक डिझाइनचे सोन्याचे कडे घातले आहे.

त्यासोबतच केसांची सुंदर वेणी, नाजूक नथ आणि कपाळावरील लहानशी टिकली यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.