01 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आपल्या अभिनयासोबतच स्टायलिश आणि फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
नुकतेच सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिचा मरून रंगाच्या साडीतील आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे.
सोनालीने मरून रंगाची साडी नेटच्या फुल स्लीव्ह्ज ब्लाऊजसोबत कॅरी केली आहे.
साडीला मॅचिंग बेल्टची स्टायलिश जोड देत तिने आपल्या लूकला मॉडर्न टच दिला आहे.