यूट्यूबर अरमान मलिकाच्या दोन लग्नांमुळे अभिनेत्रीचा संताप

05 July 2024

Created By :  Manasi Mande

यूट्यूबर अरमान मलिका हा त्याच्या दोन पत्नीसंह 'बिग बॉस ओटीटी' या प्रसिद्ध रिॲलिटी शोमध्ये आला आहे. पण त्याची पहिली पत्नी पायल मलिकचं एलिमिनेशन झालंय.

प्रेक्षकांना हे तिघे फारसे आवडले नसल्याचं दिसतंय. एवढंच नव्हे तर दोन लग्न केल्यामुळे अनेकांनी अरमानला प्रचंड ट्रोल केलं.

बऱ्याच सेलिब्रिटींनीही त्याला सुनावलं. त्यापैकीच एक म्हणजे तनाझ इराणी. एका मुलाखतीत तनाझने अरमानला, त्याच्या दोन लग्नांवरून बरंच झापलं.

मला अरमानबद्दल काहीच वाटत नाही, तो माणूस आहे हे तो (अरमान) विसरलाय बहुतेक. आणि समाजात एकदाच लग्न केलं जात, याचाही त्याला विसर पडलाय.

तो स्वत:ला ॲनिमल (जनावर) समजतोय असं वाटतं. पहिली बायको असतानाच दुसऱ्या मुलीबद्दल फीलिंग्स आल्या. आणि पहिल्या पत्नीसमोरच दुसरीशी त्याने लग्न केलं.

दुसऱ्या बायकोला घरी घेऊन आला. हिंमत असेल तर पहिल्या बायकोला सांगायचं ना की मी तुला घटस्फोट देतोय. दुसरं लग्न करतोय.

त्याला दोन बायका आहेत, हे अतिशय चुकीचं आहे. अरमान जे केलं तसं प्रत्यक्षात घडत नाही. त्या दोघींनी तरी एकत्र राहणं कसं मान्य केलं हे कळत नाही, असं तनाझ म्हणाली.