टीव्हीच्या 'आनंदी'सोबत बॉडीगार्डचं नको ते कृत्य; अभिनेत्री म्हणाली ..

18 June 2024

Created By :  Manasi Mande

टीव्हीवरील 'बालिका वधु' या मालिकेतील 'आनंदी'च्या भूमिकेमुळे अविका गौर घराघरांत पोहोचली आहे.

लहानपणापासूनच ती अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिचे लाखो चाहते आहेत.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अविकाने धक्कादायक खुलासा केला. बॉडीगार्डने चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याने ती शॉक झाली.

एका इव्हेंटदरम्यान मी स्टेजवर जात होते, तेवढ्यात मागून कोणीतरी मला स्पर्श केला.

मागे वळून बघितलं तर तिथे फक्त माझा बॉडीगार्डच होता. बाकी कोणीच उभं नव्हतं.

दुसऱ्यांदाही असंच घडणार होतं मात्र मी त्याला हटकलं. तेव्हाही तोच बॉडीगार्ड होता. शेवटी त्याने कान पकडून माफी मागितली. मी काय बोलणार होते ? मी त्याला जाऊ दिलं.

तुमच्या अशा कृतीमुळे समोरच्यावर काय परिणाम होतो हे त्यांना समजतच नाही. आत्ता मी माझ्याबद्दल बोलत्ये, माझ्या आजूबाजूला बरेच बॉडीगार्ड्स असतात, प्रोटेक्शन असतं.

पण बाहेर अशा अनेक मुली असतात ज्या बॉडीगार्ड घेऊन फिरू शकत नाहीत. त्यामुळे ही कृती अत्यंत लाजिरवाणी आहे, मी एवढंच म्हणू शकते.

अशा लोकांना धडा शिकवायला हिंमत लागते, पण आधी ती माझ्याकडे नव्हती. पण सगळयांकडे तशी हिंमत असलीच पाहिजे.

आता माझ्याकडे ती हिंमत आली आहे. पण अशी वेळ पुन्हा येऊच नये अशी मला आशा आहे.