श्वेता तिवारी तिसरं लग्न करणार ?

24 May 2024

Created By :  Manasi Mande

श्वेता तिवारी टीव्हीची आघाडीची अभिनेत्री , तिच्या पर्सनला आयुष्याचीही खूप चर्चा होते.

43 वर्षांची श्वेता तिच्या फिटनेस आणि लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते. लवकरच ती सिंघममध्ये दिसणार.

तिचा दोनवेळा घटस्फोट झाला असून तिला दोन मुलं आहे. यूजर्स तिला बरेच विचित्र प्रश्न विचारून ट्रोल करतात.

तिसरं लग्न कधी करणार ? असा प्रश्न श्वेताला अनेक वेळा विचारला जातो.

तिसरं लग्न करू नकोस, असा सल्ला मला लोकांकडून बऱ्याचदा मिळतो, असं श्वेताने जुन्या मुलाखतीत सांगितलं.

तुम्ही 10 वर्ष लिव्ह इनमध्ये असाल आणि पार्टनरला सोडलं तर कोणी बोलत नाही. पण लग्नानंतर दोन वर्षांनी बाहेर पडलात तर  लोकं लगेच प्रश्न विचारतात

तिसरं लग्न करू नको असं सांगणारे  हे सगळे कोण? माझं आयुष्य आहे, निर्णय मीच घेईन, असं तिने ठणकावून सांगितलं.