ऐश्वर्याच्या हेअरस्टाईलचीच 'कान्स'मध्ये चर्चा, ड्रेसमुळे झाली ट्रोल

17 May 2024

Created By :  Manasi Mande

ऐश्वर्या राय बच्चन कान्समध्ये सहभागी होणार आणि तिची चर्चा होणार नाही, असं कधीच होऊ शकत नाही.

यंदाही ऐश्वर्याने तिचा जलवा दाखवला. ब्लॅक-गोल्डन कॉम्बिनेशन आणि पांढऱ्या रफल स्लीव्ह्ज असलेल्या ड्रेसमध्ये ती अप्रतिम दिसली.

 तिच्या या ड्रेसवर काही फुलं ॲटॅच करण्यात आली. दुखापतीमुळे हाताला प्लास्टर असलं तरी रेड कार्पेटवर ऐश्वर्याची शान कमी झाली नाही.

पण युजर्सना तिच्या ड्रेसपेक्षा तिचा लूक आवडला. कारण यावेळी ऐश्वर्याने  हेअरस्टाइल बदलली.

ऐश्वर्याने अर्धे केस बांधले, त्यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. नेहमीप्रमाणे तिने तिचा चेहरा केसांनी लपवला नव्हता.

 हे पाहून चाहते खुश झाले. ऐश्वर्याच्या ड्रेसने काही फरक पडत नाही, मला तिचे केस, मेकअप खूप आवडला. ती किती क्युट दिसत्ये, असं एकाने लिहीलं.

पण काही युजर्सना ड्रेस बिलकूल आवडला नाही, त्यासाठी तिला ट्रोलही करण्यात आलं.

रेड कार्पेटवर ऐश्वर्याने घातलेला हा ड्रेस फाल्गुनी शेन पीकॉकने डिझाईन केला होता.