महागडे कपडे परवडत नाहीत; प्रसिद्ध अभिनेत्री असं का म्हणाली ?

09 May 2024

Created By :  Manasi Mande

'नागिन' फेम प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश एका डिझायनर आउटफिटमध्ये दिसली. रॅम्प वॉकसाठी तिने हा ड्रेस परिधान केला.  

सोशल मीडियावर तेजस्वीचा इंटरव्ह्यू व्हायरल झाला. मी खूप साधे कपडे घालणं पसंत करते, असं ती त्यात म्हणाली.

ब्रँडेड कपड्यांबद्दल बोलायचं झालं तर मला ते परवडत नाहीत. स्वत:साठी खूप महागडे कपडे विकत घेऊ शकेन, एवढे पैसे माझ्याकडे नाहीत.

तेजस्वी म्हणाली - मी खूप साधे कपडे विकत घेते, जे बराच काळ टिकतील आणि वापरू शकेन. मला महाग कपडे घ्यायला फारसं आवडत नाही.

'बिग बॉस'मधून तेजस्वी रातोरात लोकप्रसिद्ध झाली. तेथे तिचं नातं करण कुंद्राशी जुळलं, ते दोघे आजही एकत्र आहेत.

तेजस्वी-करण बरेचदा सुट्टीसाठी , फिरायला जातात. एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम ते खुलेपणाने व्यक्त करतात. सोशल मीडियावरही फोटो शेअर करतात.

 रिपोर्ट्सनुसार, तेजस्वी-करण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.