'राईज अँड फॉल' या अशनीर ग्रोव्हरच्या शोची शानदार सुरूवात झाली आहे. शो सुरू होऊन अवघे तीन दिवस झाले असली तरी सगळीकडे त्याचीच चर्चा आहे.
माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा, पण आता मुलगी बनलेली अनाय बांगर देखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.
या शोमध्ये अनाया तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसत्ये. आकृती नेगीशी ती, मुलगी बनल्यावर आयुष्यात काय बदललं यावर बोलताना दिसली.
तू कंटेंट बनवते, असं आकृतीने तिला विचारलं. त्यावर अनाया हो म्हणाली. मी त्यात सगळं खरंत सांगते, असंही तिने नमूद केलं.
सोशल मीडियावर चांगला सपोर्ट मिळतो का ? असं आकृतीने विचारला. त्यावर अनाया म्हणाली कमेंट्समध्ये मला जितका द्वेष दिसतो, तितंकच प्रेम मला मेसेजेसमधून मिळतं.
आत्तापर्यंत मला 30 ते 40 हजार लग्नाचे प्रस्ताव आलेत असं अनायाने सांगितलं. तिच्या या खुलाशाने आकृतीला धक्का बसला.
अनाया ही आधी मुलगा होती, त्याचं नाव आर्यन होतं. मात्र काही वर्षांपूर्वी जेंडर चेंज ऑपरेशन करून ती मुलगी बनली आणि अनाया हे नाव धारण केलं. ती क्रिकेटर आणि मॉडेल आहे.