6 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
आयशा खान आपल्या हटके स्टाईल आणि फॅशनमुळे नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
मात्र, यावेळी ती बोल्ड नाही तर चक्क मराठमोळा लुकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आली आहे.
दहीहंडीच्या खास कार्यक्रमासाठी आयशाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
साडीवरील आकर्षक नक्षीकाम आणि पारंपरिक दागिन्यांमुळे तिचा लूक खुलून दिसत होता.
साधेपणा आणि पारंपरिक सौंदर्याचा सुरेख मिलाफ तिच्या या लूकमध्ये पाहायला मिळाला.