Met Gala 2025 : 'मेट गाला'मध्ये पोहोचलेल्या या कोट्याधीश बेस्टफ्रेंड्सना ओळखलं का?

6 May 2025

Created By : Manasi Mande

'मेट गाला' नुकताच आयोजित करण्यात आलं होतं. यावर्षीही बॉलिवूडच्या अनेक दिग्गज यात सहभागी झाले.

याचवेळी मेट गालामध्ये बालपणीच्या दोन मैत्रिणीही दिसल्या. अभिनेत्री कियारा अडवाणीने मेट गालामध्ये डेब्यू केलं तर ईशा अंबानीचाही जलवा कायम होता.

मेट गालामध्ये सहभागी होण्याची ईशा अंबानीची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही ती सहभागी झाली होतीच.  ईशा-कियारा लहानपणापासून मैत्रिणी असून एकाच शाळेत शिकल्यात.

कपिल शर्मा शोमध्ये खुद्द कियारानेच या गोष्टीचा उलगडा केला होता. त्या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. ती अनेकदा ईशा अंबानीच्या घरीही गेली आहे.

कियारा अडवाणी लवकरच आई बनणार आहे.  काही महिन्यांपूर्वीचे तिने ही गुड न्यूज शेअर केली. पहिल्यांदा मेट गालामध्ये सहभागी झालेल्या कियाराने तिचं बेबी बंप फ्लाँट केलं.

तर तिची बेस्ट फ्रेंड ईशा अंबानीही  मेट गाला 2025 मध्ये सहभागी झाली. तिच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

1931 साली तयार झालेला खरा महाराजा हार ईशाने घातला , अशी चर्चा आहे. 1931 साली नवाबनगरचे महाराजा दिग्विजय सिंह जडेजा आणि रणजित सिंहने हा बनवून घेतला.

Cartier पासून हा ' नवाब नगर हिऱ्याचा हार' बनवण्यात आला होता. 2025 मध्ये मेट गालामध्ये ईशाने तो फ्लाँट केला.