Sara Tendulkar : साराने विचारला एकच महत्वाचा प्रश्न...

17 April 2025

Created By : Manasi Mande

नामवंत  क्रिकेटर सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याची लेक साराही ऑस्ट्रेलियाच्या प्रेमात पडल्ये, असं दिसतंय.

आपल्या मोठया कारकिर्दीत सचिनने ऑस्ट्रेलियाचे अनेक दौरे केले आणि तेथील मैदानात अनेक शतकं झळकावली.

आता सारा तेंडुलकरही वारंवार ऑस्ट्रेलियाला जाताना दिसत आहे. ती पुन्हा तिथेच पोहोचली.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनच्या लेकीसह आणि इतर मित्र-मैत्रिणींसह सारा ऑस्ट्रेलियात मस्त फिरत्ये.

साराने आता तिच्या शरीरावर एका टॅटू काढण्याचाही निर्णय घेतलाय असं दिसतंय. पण त्यापूर्वी तिने चाहत्यांना महत्वाचा प्रश्न विचारलाय.

मेलबर्नमध्ये एका टॅटू शॉपबाहेर काढलेला फोटो साराने इन्स्टाग्राम स्टोरीवर टाकला आणि विचारलं - टॅटू काढावा की नाही ?

त्यावर चाहत्यांनी साराला काय उत्तर दिलं आणि तिने टॅटू काढला की नाही, याचं उत्तर साराकडूनच मिळू शकेल.