सलमान खान आणि आई सलमा यांचं खरं नाव माहितीये ?

9 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

सलमान खानचे चाहते भारतापासून परदेशातही आहेत.

सुपरस्टार सलमान खानला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमान खानचे नाव प्रत्येकच्या ओठांवर असतं.

पण सलमान खानची खरी ओळख काही वेगळीच आहे. सलमानचे खरे नाव काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

सलमानचे खरे नाव त्याचे वडील सलीम खान यांनी अब्दुल रशीद सलीम सलमान खान असे ठेवले होते.

पण चित्रपटांमध्ये काम करायचे असल्याने सलमानने त्याचे नाव लहान केलं. त्याचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी इंदूर येथे झाला.

सलमानची आई हिंदू असून त्यांचं खरं नाव सुशीला चरक होते. लग्नानंतर सलमानच्या आईचे नाव सलमा असे ठेवण्यात आले.

सलमान खान गेल्या दोन दशकांपासून त्याच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. आता लवकरच तो सिकंदरमध्ये दिसणार आहे.