मि.परफेक्शनिस्ट, आमिर खानचं गाव कोणतं ?

4 July 2025

Created By : Manasi Mande

अभिनेता आमिर खानचे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत.

14 मार्च 1965 साली त्याचा जन्म मुंबईत झाला, तिथेच तो वाढला. आजही तो कुटुंबासह मुंबईतच राहतो.

पण इतरांप्रमाणेच आमिर खानचं देखील गाव आहे, ते उत्तर प्रदेशमध्ये आहे हे फारच कमी लोकांना माहीत असेल.

आमिर त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे बराच चर्चेत असतो. तो अनेकदा लहानपणीचे किस्सेही सांगत असतो.

पण तो त्याच्या गावाबद्दल फारसा बोलताना दिसत नाही, पण गावी त्याचं वडिलोपार्जित घरही आहे.

आमिरचं गाव उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील शाहाबादजवळचं अख्तियारपूर आहे. तिथे त्याच्या आजोबा-पणजोबांचं घरं होतं.

रिपोर्टनुसार, आमिरच्या आजोबांची आमराई होती. पण आता ते गाव जवळपास उजाड झालं आहे असं म्हणतात