प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होणार नेपाळची सून; लग्नाची तारीखही जाहीर

23 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

प्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्यूबर प्राजक्ता कोळी लवकरच बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत लग्न करणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, प्राजक्ता वृषांकसोबत 25 फेब्रुवारी 2025 रोजी लग्न करणार आहे

अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी प्राजक्ताच्या लग्नाबाबत ही माहिती दिली आहे

23 फेब्रुवारीच्या रात्रीपासून मेहंदी, हळद आणि संगीत हे सर्व समारंभ होणार आहेत

 तर, 25 तारखेला लग्न झाल्यावर भव्य रिसेप्शनही ठेवण्यात येणार आहे.

प्राजक्ता आणि वृषांक कॉलेजच्या दिवसांपासून एकत्र आहेत. त्यांच्या रिलेशनला 12-13 वर्ष झाली आहेत

वृषांक हा वकील असून तो नेपाळचा रहिवासी आहे. म्हणजेच प्राजक्ता आता नेपाळची सून होणार आहे.