'कोणाच्या नावाचं सिंदूर?' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीच्या भांगेत कुंकू, चाहते कन्फ्युज

10 May 2024

Created By :  Manasi Mande

प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौर 4 महिन्यांपासून भारतात आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ती केनियामधून मायदेशात परतली.

आई-वडिलांच्या ऑपरेशनसाठी दलजीत मुलासह घरी आली. पण काही दिवसांतच तिच्या घटस्फोटाबद्दलच्या बातम्या कानावर पडू लागल्या.

रिपोर्ट्सनुसार, दलजीतचं दुसऱ्या पतीसोबत पटत नसल्यामुळे त्यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. तिने तिच्या अकाऊंटवरून लग्नाचे फोटोही डिलीट केले.

तिने पती निखिल पटेललाही अनफॉलो केले. एका इंटरव्ह्यूदरम्यान तिला प्रश्न विचारण्यात आला, पण तिने त्यावर बोलण्यास नकार दिला.

यादरम्यान ती सतत शूटिंग करत्ये, पण  तिने हातातली साखरपुड्याची अंगठी काढली नाही.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दलजीतने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तिच्या भांगेत सिंदूर दिसला. पण गळ्यात मंगळसूत्र नव्हतं.

दलजीतच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कधी घटस्फोटाची बातमी येते, कधी सिंदूर दिसतो. काय सुरूये ?