ऐश्वर्यापासून ते आलियापर्यंत सर्वांची निकनेम आहेत फारच गंमतीशीर; हसू आवरणार नाही
11 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
संपूर्ण जग बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला ऐश या नावाने ओळखतं. पण तुम्हाला माहितये का? तिचे खरं टोपणनाव काय आहे?
ऐश्वर्याचे टोपणनाव गुल्लू आहे. तिच्या कुटुंबातील सदस्य तिला याच नावाने हाक मारतात.
आलिया भट्टचे आईवडील तिला लहानपणापासून आलू म्हणून हाक मारतात.
अनुष्का शर्माचे कुटुंबीय तिला नुष्केश्वर म्हणत असत. मोठे झाल्यानंतर तिचं नाव नुष्की झालं. असं म्हणतात की विराटही तिला नुष्की म्हणतो.
प्रियांका चोप्राला तिचे चाहते देसी गर्ल म्हणतात. पण तिचे पालक त्याला मिठू म्हणतात. तिच्या जवळचे लोक तिला पिगी चॉप्स आणि मिमी असेही म्हणतात.
श्रद्धा कपूरला तिच्या मैत्रिणी चिमडी म्हणतात. राणी आणि श्रेड हे देखील तिचं टोपणनाव आहे.
तर सोनम कपूरचं देखील मजेशीर निकनेम आहे. तिला घरचे सगळे जिराफ म्हणतात. तिने स्वतः याबद्दल सांगितलं आहे.
आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व सर्वात जास्त असतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा