रुबिना दिलैकचे ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट  (Photos : Instagram)  

15 November 2023

Created By : Manasi Mande

रुबिना दिलैक हिने  मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते.

तिचे मोठे फॅन फॉलोईंगही आहे. रुबिना सध्या तिचा प्रेग्नन्सीचा काळ मजेत एन्जॉय करत आहे.

 रुबिना ही दररोज नवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करते.

तिने नुकतेच मॅटर्निटी फोटोशूट केले असून त्यातील काही फोटो तिने शेअर केले. 

या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत्ये. गोल्डन रंगाच्या एका ड्रेसमध्ये तिने कॅमेऱ्यासमोर विविध पोझ दिल्या आहेत.

मॅटर्निटी फोटोशूटसाठी रुबिनाने ट्रॅडिशनल डिझाइन असलेला एक ओपन गाऊन परिधान केला आहे.

त्यासह तिने बरीचशी ज्वेलरीही कॅरी केली आहे. गळ्यात चोकर नेकलेससह तिने दोन लेअर्सचा हारही घातला आहे.

 खांद्यावरही एक खास ज्वेलरी आणि हातात भरपूर बांगड्या असा तिचा हटके लूक खूप व्हायरल झाला आहे.

यापूर्वीही तिने पती अभिनवसोबत एक आगळंवेगळं शूट केलं होतं.