26 एप्रिल 2026
Created By: Soneshwar Patil
टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक पुन्हा एकदा आपल्या साध्या, नैसर्गिक आणि देखण्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकली असून तिचा देसी अंदाज जोरदार व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये ती हलक्या गुलाबी रंगाच्या साडीत दिसत असून तिचा हा लूक अत्यंत आकर्षक वाटतो आहे.
साधेपणातही सौंदर्य कसं खुलतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे तिचं हे फोटोशूट. या साडीला तिने ब्राइट पिंक रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे.
डीप नेक डिझाइन असलेल्या या ब्लाउजमुळे तिच्या लूकमध्ये थोडासा बोल्ड टचही दिसून येतो आहे.