ऑरी लाखो रुपये कमावतो तरी कसे  ?

15 March 2024

Created By : Manasi Mande

ओरहान अवत्रामणि उर्फ ऑरी हे देशातलं असं नाव आहे, ज्याच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.  

अंबानीच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये ऑरीवर खूप लाईमलाइट होता. त्याने रिहानासोबत भन्नाट डान्सही केला.

ऑरी बऱ्याच वेळेस बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींसोबत पार्टी करताना दिसतो. स्टार किड्ससोबतही त्याचं चांगलं बाँडिंग आहे.

पण अवघ्या तासांत ऑरी लाखोंची कमाई करतो हे तुम्हाला माहीत आहे का ? खुद्द ऑरीनेच याबद्दल खुलासा केला.

लोकांच्या इव्हेंट्समध्ये सहभागी होऊन मी बराच पैसा कमावतो, असं ऑरीने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

वेगवेगळे इव्हेंट्स आणि पार्टीत सहभागी होऊन तो लोकांना खुश, आनंदी राहण्याचा मेसेज देतो.

मोठमोठे लोक ऑरीला आपल्या लग्नात आणि इव्हेंट्समध्ये बोलावण्यासाठी  15 ते 30 लाखांपर्यंत रक्कम देतात. हाच त्याच्या कमाईचा सोर्स आहे.