हार्दिकशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशाला देवाची आठवण

29 May 2024

Created By :  Manasi Mande

हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्यातील घटस्फोटाच्या बातम्यांनी वातावरण तापलं आहे.

सध्या सगळ्यांचंच लक्ष हार्दिक आणि नताशावर टिकून आहे.

याचदरम्यान नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये  नताशाने येशू ख्रिस्त यांचा फोटो शेअर केला आहे.

त्यामध्ये एका शेळीचं पिल्लू येशू ख्रिस्त यांच्या पुढे -पुढे चालताना दिसत आहे.

मात्र या फोटोसोबत नताशाने कोणतीही कॅप्शन लिहीलेली नाही.

ही पोस्ट व्हायरल झाली असून लोकांनी त्यावर कयास बांधले आहेत. नताशाला देवाची आठवण आली, असं काही लोकांचं म्हणणं आहे.

तर काही यूजर्स मात्र तिला बरंच ट्रोल करत आहेत.

घटस्फोटाच्या वृत्तांवर नताशा किंवा हार्दिकने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

त्यांच्यात नेमकं काय सुरूये, हे तर ते दोघंच सांगू शकतात.