ऐश्वर्या रायचं पहिलं प्रेम कोण होतं ?

08 December 2023

Created By : Manasi Mande

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यात दुरावा आल्याची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

त्याचदरम्यान ऐश्वर्याच्या लव्ह लाइफशी निगडीत आणखी एक कहाणी समोर येत आहे.

ऐश्वर्याच्या पहिल्या प्रेमाबद्दल फार कमी लोकांना माहीत असेल.

ऐश्वर्याचं ज्याच्यावर प्रेम होतं तो कोणी सुपरस्टार नव्हे...

अभिनय करण्यापूर्वी ऐश्वर्या बराच काळ मॉडेलिंग करत होती.

त्याचदरम्यान मॉडेल राजीव मूलचंदानी तिला आवडू लागला. दोघंही एकमेकांबाबत सीरियस होते.

पण ऐश्वर्याला तेव्हा करीअरवर फोकस करायचा होता, तर राजीवला हे नातं पुढपर्यंत न्यायचं होतं.

त्यामुळे ऐश्वर्या आणि राजीव याचं नातं अखेर तुटलं आणि त्यांची प्रेमकहाणी अधुरीच राहिली.