या अभिनेत्रीचं आयुष्य म्हणजे वादळ

07 December 2023

Created By : Manasi Mande

'देवों के देव महादेव' मालिकेतून लोकप्रिय झालेल्या  अभिनेत्री पूजा बॅनर्जीचं खरं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे.

खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झालेली ही सुंदर अभिनेत्री वयाच्या १५ व्या वर्षी घरातून पळाली. पूजानेच मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

पूजा 15 व्या वर्षी घरून पळाली. एवढेच नव्हे तर ती लग्नापूर्वीच प्रेग्नंटही राहिली.

 2004 साली पूजाने प्रियकर अरूनोयशी लग्न केलं, पण नात्यात कटूता वाढल्यावर 2013 साली ते वेगळे झाले.

पहिल लग्न मोडल्यावर पूजाने करीअरवर फोकस केलं.  देवो के देव महादेव मधून ती खूप लोकप्रिय झाली.

त्याशिवाय ती कसौटी जिंदगी की मालिकेतही झळकली. तिने अनेक लक्षणीय भूमिका केल्या.

त्यादरम्यान तिची कुणाल वर्माशी ओळख झाली, दोघं प्रेमात पडले.

काही वर्ष डेटिंग केल्यावर दोघांनी 2021 मध्ये गोव्यात लग्न केले. मात्र, त्याआधीच 2020 मध्ये पूजा आई झाली.

आम्ही बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले. आमचं लग्न झालं, एक मूल असलं तरी, पुन्हा लग्न करणं ही एक नवी अनुभूती असल्याचे पूजा म्हणाली.