फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर इतक्या कमी किमतीत विकली जातेय 'ऑस्कर ट्रॉफी'

2 मार्च 2025

Created By : मयुरी सर्जेराव

चित्रपटांची आवड असलेले सर्वच प्रेक्षक ऑस्कर 2025 च्या विजेत्याच्या घोषणेची वाट पाहत आहेत.

विजेत्याचे नाव 3 मार्च रोजी सकाळी अकॅडमी अवॉर्ड्समध्ये जाहीर केलं जाणार असून त्या विजेत्याला ट्रॉफी दिली जाणार

मात्र आता ऑस्करसारखी हुबेहूब जिसणारी ट्रॉफी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन साइटवरही उपलब्ध झालीये

या दोन्ही ई-कॉमर्स साइट्सवर ऑस्कर ट्रॉफी नावाने सर्च केल्यास ऑस्करसारखी दिसणारी ट्रॉफी समोर येते

ही ऑस्कर ट्रॉफी अॅमेझॉनवर 262 रुपयांना उपलब्ध आहे.

तर ही ट्रॉफी फ्लिपकार्टवर फक्त 353 रुपयांना आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रॉफीची रचना सारखीच आहे.

भारतीय वेळेनुसार 3 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता तुम्ही 'अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस'चा हा कार्यक्रम YouTube वर मोफत पाहता येणार आहे.

ऑस्कर नामांकन यादीत भारताचा 'अनुजा' चित्रपट देखील समाविष्ट आहे. हा चित्रपट पुरस्कार जिंकतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.