अभिनेत्रीने टॉपलेस फोटो पोस्ट करताच चाहत्यांची लाखोली...

10 May 2024

Created By :  Manasi Mande

आमना इलियास ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री, ती सोशल मीडिया सेन्सेशनही आहे. ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

पण कधी अती ग्लॅमरसपणामुळे तिला लोकांचे टोमणेही ऐकावे लागतात. सोशल मीडियावर ती पुन्हा ट्रोल झाली.

तिने इन्स्टाग्रामवर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले. यामध्ये तिने टॉपलेस होऊन फुलांसोबत पोज दिली.

सुंदर पांढऱ्या फुलांसह तिने तिचे शरीर झाकले. Illusion (भ्रम) असे तिने कॅप्नमध्ये लिहीले.

तिने हा फोटो शेअर करताच लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली.

लाज वाटली पाहिजे तुला, असे एका युजरने लिहीलं. असं फोटोशूट करताना लाज वाटली नाही का ?  देवाला तरी घाबर, अशी कमेंटही लोकांनी केली.

तिच्या पोस्टवर लोकांनी एवढ्या वाईट पद्धतीने कॉमेंट्स केल्या की तिला तिचं कॉमेंट सेक्शनच बंद कराव लागलं. पण लोकं थांबली नाहीत.

काही लोकांनी तिच्या जुन्या फोटोंवर कमेंट करत तिला फटकारलं. यापूर्वीही तिला बऱ्याचदा ट्रोल करण्यात आलं होतं.

आमनाने 17 व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केलं. नंतर तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं.