प्राजक्ता गायकवाडच्या घरी लगीनघाई ! घाणा भरण्याच्या कार्यक्रमात सुंदर लूकने वेधलं लक्ष
29 November 2025
Created By : Manasi Mande
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. लवकरच तिचं लग्न होणार आहे.
प्राजक्ता गायकवाड हिच्या होणाऱ्या पतीचं नाव शंभुराज खुटवड असं आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला.
येत्या 2 डिसेंबरला तिचं लग्न पार पडणार आहे. महिन्याभरापूर्वी तिने इन्स्टाग्रामवर लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला होता.
लग्नाला अवघे काही दिवस उरलेले असतानाच तिच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. प्राजक्ताच्या घरी नुकताच घाणा भरण्याचा कार्यक्रम पार पडला.
तसेच भावी वधूच्या हातात चुडाही भरण्यात आला. या सर्व समारंभांचीझलक प्राजक्ताने तिच्या अकाऊंटवर शेअर केली आहे.
त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला असून तिच्या चाहत्यांनी प्राजक्ताला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्राजक्ताचा साडीमधला लूक चाहत्यांना खूप आवडला असून त्यांनी भरभरून कमेंट्स करत तिचं कौतुकही केलं.
Mahima Caudhary : ‘परदेस’मध्ये शाहरुख सोबत झळकली, महिमा चौधरीचं खरं नाव काय ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा