18 मे 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने यंदाच्या Cannes Film Festival मध्ये दमदार पदार्पण करत मराठी संस्कृतीचा ठसा उमटवला आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवर प्राजक्ता पारंपरिक नऊवारी साडी, नथ आणि मराठमोळ्या दागिन्यांमध्ये झळकली.
तिच्या खास लूकने उपस्थितांचे तसेच परदेशी फोटोग्राफर्सचे लक्ष वेधून घेतले. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर रेड कार्पेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे.
जगप्रसिद्ध कान्स रेड कार्पेटवर अस्सल मराठी नऊवारीत चालण्याचा आनंद अवर्णनीय आहे अशी भावना तिने व्यक्त केली.
तिच्या या मराठमोळ्या अंदाजाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.