प्रिया बापटची 'धमाल..', फॅमिलीसह एन्जॉय केली दुबई ट्रीप 

29 May 2025

Created By : Manasi Mande

मराठी तसेच हिंदीतही काम करत, मालिका, जाहिराती, वेबसीरिज गाजवणारी, अभिनेत्री प्रिया बापटचे लाखो चाहते आहेत. (photo : Insta)

प्रिया आणि उमेशची जोडी अनेकांची आवडती असून सोशल मीडियावरही प्रिया खूप ॲक्टिव्ह असते.

नुकतीच ती दुबईला गेली. फॅमिलीसह धमाल केलेल्या या ट्रीपचे खास फोटो तिने अकाऊंटवर शेअर केलेत.

दुबईत प्रियाने तिचे बाबा, नवरा उमेश, बहीण आणि भाच्चीसह अनेक फोटो काढले, विविध ठिकाणी फिरली.  

बाबांसोबतचा खास फोटो शेअर करत प्रियाने गोड कॅप्शन दिली.

यावेळी प्रियाने तिच्या भाचीसोबतही अनेक फोटो काढले.

या ट्रीपमध्ये प्रियाने फ्रमिलीसह 'झू'लाही भेट दिली.

तिथले काही फोटो, तिने गंमतीदार कॅप्शनसह शेअर केले.

प्रियाच्या या दुबई ट्रीपच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव केलाय.