अर्ध्यावरती मोडला 'या' सेलिब्रिटींचा संसार

11 March 2024

Created By : Manasi Mande

‘फुकरे’ फेम पुलकित सम्राट हा अभिनेत्री कृती खरंबदासोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. पण हे त्याचं दुसरं लग्न आहे. सलमानच्या बहिणीशी त्याने लग्न केलं पण..

 2014मध्ये पुलकितने श्वेता रोहिराशी लग्न केलं. लग्नाला खुद्द सलमान खान आला होता. मात्र वर्षभराच्या आतच दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले.

आणखीही अशीच सेलिब्रिटी जोडपी आहेत, ज्यांचा संसार अर्ध्यावरती मोडला

अभिनेत्री रश्मी देसाईने ‘उतरन’ मालिकेतील सहकलाकार नंदीश संधूशी लग्न केलं. मात्र लग्नानंतर ५ वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.

‘दिल मिल गए’ या शोमधील कपल  जेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हरने झटपट लग्न केलं. करणचं हे दुसरं लग्न होतं. 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं पण दोन वर्षांतच त्यांचा संसार मोडला.

श्वेता तिवारीने 1998 साली राजा चौधरीशी लग्न केलं पण 2007 मध्ये घटस्फोट घेतला. नंतर तिने 2013मध्ये अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं पण 2019मध्ये तेही वेगळे झाले.

‘कुमकुम’ फेम जुही परमारने अभिनेता सचिन श्रॉफशी लग्न केलं. 2009मध्ये त्यांचं लग्न झालं पण 2018 साली त्यांचा संसार मोडला.

रिद्धि डोगरा आणि राकेश बापटने मालिकेत एकत्र काम केलं आणि प्रेमात पडले.  2011मध्ये त्यांनी थाटात लग्न केलं पण 2019 साली ते वेगळे झाले.

संजीदा शेख आणि आमिर अली हे टीव्हीवरचं लोकप्रिय कपल. त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं. सगळं आलबेल असतानाच 2022मध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला.