करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी

15 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

करीना कपूरचीही एक फेव्हरेट डीश आहे जी सध्या व्हायरल होतेय

करीनाला सिंधी कढी प्रचंड आवडते

या सिंधी कढीची रेसिपीही अगदी झटपट होणारी आहे. शिवाय ही कढी प्रोटिन्सने भरपूर आहे

सर्वप्रथम एका पॅनमध्ये बेसन मध्यम आचेवर हलके तपकिरी होईपर्यंत भाजून

हळूहळू त्यात पाणी घाला आणि ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.

आता कढईत तेल गरम करा.त्यात मोहरी, मेथी, कढीपत्ता, हिंग,चिरलेली हिरवी मिरची टाका आणि कढईत बेसन घालून मिक्स करा.

त्यावर लाल तिखंट, धने पावडर, आणि घरचा मसाला असल्यास तो एक चमचा घालावं

मसाल्याचा सुगंध सुटल्यावर त्यात टोमॅटो, भेंडी, बटाटे, गाजर, शेवगाच्या शेंगा घाला. नंतर मंद आचेवर शिजवा.

 लक्षात ठेवा, यावेळी करी घट्ट होऊ नये. भाजी शिजल्यावर त्यात चिंचेचा कोळ आणि मीठ टाका.

 आता 7-10 मिनिटे शिजवा. फक्त करी तयार आहे. रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करा.