माझे लग्नाचे दिवस आता.. काय म्हणाला सलमान खान ?

7 February 2024

Created By : Manasi Mande

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान कधी आणि कोणाशी लग्न करणार ? या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच जाणून घ्यायचयं.

जगभरातल्या तरूणी, महिला या सलमानवर फिदा आहेत, त्याच्याशी लग्न करायची अनेकींची इच्छा आहे.

पण सलमानचा आता लग्न करायचा काहीच प्लान नाही. लग्नाबद्दल सलमानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्याने मजेशीर उत्तर दिलं.

गेल्या वर्षी IIFA रॉक्स इव्हेंटमध्ये एका फॅनने सलमानला लग्नासाठी प्रपोज केलं होतं.

मात्र ते प्रपोजल ऐकून सलमान लाजला. त्यानंतर त्याने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळ्यांनाच हसू फुटलं.

सलमान हसत म्हणाला  'माझे लग्नाचे दिवस आता गेले'. त्यावर फॅनने विचारलं पण असं का ?

त्यावर सलमान म्हणाला लग्नासाठी तुम्ही मला 20 वर्षांपूर्वी भेटायला हवं होतं.

सलमानच्या आयुष्यात अनेक महिला आल्या, ऐश्वर्या रायसोबतच्या त्याच्या नात्याची अजूनही चर्चा होते. पण सलमानचं कोणतही नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.