सानियासोबत ज्याच्या नात्याची चर्चा, त्याने आधीच दोघींना ..

29 June 2024

Created By :  Manasi Mande

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचं नाव खूप चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे मोहम्मद शमी. त्या दोघांच्या लिंकअपची बरीच चर्चा सुरू आहे.

मात्र सानियाच्या जुन्या प्रेमप्रकरणाबद्दलही चर्चा होत असते. एके काळी तिचं नाव अभिनेता शाहिद कपूरसोब जोडलं गेलं होतं.

शाहिद- सानिया एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्या केवळ अफवा असल्याचे सानियाने स्पष्ट केले होते.

सानिया मिर्झाशिवाय शाहिद कपूरच नाव बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींशीही जोडलं गेलं होतं. तेव्हा शाहिद खूप सीरियस होता.   

पहिलं नाव करीना कपूरचं , त्या दोघांचं नात जगजाहीर होतं. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

तर दुसरी अभिनेत्री होती प्रियांका चोप्रा. प्रियांका-शाहिदच्या जवळीकीचे किस्से खूप व्हायरल झाले. पण त्यांचं नातंही फार काळ टिकलं नाही.

प्रेमात दोनदा अपयशी ठरल्यावर शाहिदने मूव्ह ऑन करण्याचा निर्णय घेतला आणि मीरा राजपूतशी अरेंज मॅरेज केलं.