कार्तिक आर्यनचं स्वयंवर ? घरच्यांनी मुलगीही पसंत.. कोण आहे ती  ?

19 June 2024

Created By :  Manasi Mande

ग्रेट इंडियन कपिल शो आता बंद होणार आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आईसोबत आला होता.

शोमध्ये त्यांनी बरीच मस्ती केली. एवढंच नव्हे तर तिथे कार्तिकचं स्वयंवरदेखील झालं आणि त्याच्या आईने कार्तिसाठी मुलगीही पसंत केली.

त्याचा प्रोमो समोर आला असून कार्तिकच्या चाहत्यांचं मन तुटणार आहे असं दिसतंय.  कारण कार्तिकनेही एक मुलगी फायनल केली.

कार्तिकची आई म्हणाली की त्यांना डॉक्टर सून हवी आहे.

स्वयंवरमध्ये सहभागी झालेली एक मुलगी म्हणाली की मी कधीच तुझा (कार्तिक) फोन चेक करणार नाही, ते ऐकून कार्तिकने लगेच होकार दिला.  

कार्तिकच्या लग्नाचे सनई-चौघडे लवकरच वाजणार असं या शोचा प्रोमो पाहून वाटतंय.

या शोमध्ये कार्तिकच्या आईने त्याची अनेक गुपितं उलगडली.

या प्रोमो मध्ये  सुनील ग्रोव्हर आणि कृष्णा अभिषेकचं एक सरप्राईजही पहायला मिळालं.

कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून चांगली कमाई करत आहे.