सारा तेंडुलकर की सिद्धांत चतुर्वेदी, जास्त श्रीमंत कोण  ?  

5 May 2025

Created By : Manasi Mande

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर नेहमी लाईमलाईटमध्ये असते. नुकतीच तिची आणि शुबमन गिल्याच्या ब्रेकअपची बातमी समोर आली.

मात्र त्याच दरम्यान आता साराचं नाव बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीशी जोडलं जातंय.

नुकताच फिल्मफेअरमध्ये एक रिपोर्ट  आला, सारा आणि सिद्धांत एकत्र वेळ घालवत असल्याचे त्यात नमूद करण्यात आलं होतं.

मात्र, दोघांचं नातं सध्या सुरवातीच्या स्टेजमध्ये आहे. दोघांनाही हे नातं उघड करण्याची इच्छा नाही.

साराशी नाव जोडलं जाण्यापूर्वी सिद्धांतचं नाव अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाशी जोडलं गेलं होतं. ते दोघं बऱ्याचदा एकत्रही दिसले होते.

मात्र आता डेटिंगच्या अफवानंतर सिद्धांत किंवा सारा कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दोघांमध्ये जास्त श्रीमंत कोण ते जाणून घेऊया.

सिद्धांतने अनेक चित्रपटांत एकत्र काम केलंय,तो ब्रँड एँडॉर्समेंटद्वारेही चांगली कमाई करतो. रिपोर्टनुसार त्याचे नेटवर्थ 41 कोटी आहे.

तर सारा तेंडुलकरही सोशल मीडियाद्वारे तगडी कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिचे नेटवर्थ 1 कोटीपेक्षा जास्त आहे.