आवडत नसेल तर बघता कशाला ? सरगुन मेहता संतापली

31 May 2024 

Created By :  Manasi Mande

'बादल पे पांव है' या आगामी मालिकेमुळे अभिनेत्री सरगुन मेहता खूप एक्सायटेड आहे. ती या शोची प्रोड्युसरही आहे.

टीव्ही मालिकांवर टीका करणाऱ्या, त्या भडक असतात असं म्हणणाऱ्या लोकांना एका मुलाखतीदरम्यान तिने चोख प्रत्युत्तर दिलं.

टीव्हीवर प्रत्येक गोष्ट भडक दाखवतात, असं का म्हणतात कळत नाही. चित्रपट पाहताना २ तास त्यावर फोकस करता ना ?

कुटुंबासह ओटीटीवर एखादा शो पाहिला तरी कॉन्टेन्टवर फोकस असतो. पण टीव्हीबद्दल तुम्ही म्हणता की ते भडक आहे.

टीव्हीवर गोष्ट नसते का ? एखादी गोष्ट लाऊड असेल पण काही मुद्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, हे दाखवण्याचा प्रयत्न असतो.

प्रत्येक गोष्टीमागे लॉजिक असतं. टीव्हीद्वारेही आम्ही लोकांना जागरूक करतो.  पण काहीजण ट्रोल करायलाच टपलेले असतात.

कोट्यवधी लोक मालिका पाहतात, त्यांच्याशी जोडले जातात. तुम्हाला ( मालिका) आवडत नसतील, तर पाहू नका. जबरदस्ती नाहीये, अशा शब्दांत सरगुनने ट्रोलर्सना फटकारलं.