ऑरीची अतरंगी फॅशन पाहून नेटकरी हैराण (photo : Insta)

22 February 2024

Created By : Manasi Mande

ओरहान अवत्रामणि उर्फ ऑरी हा सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहे. त्याचा फॅशन सेन्स आणि सेलिब्रिटींसोबतचे फोटो खूप व्हायरल होतात. 

ऑरी अनेकदा त्याच्या अजब-गजब मोबाईल फोन कव्हरमुळेही चर्चेत असतो. नुकतंच त्याने 'पालीच' मोबाईल कव्हर वापरलं.

 पण आता ऑरीच्या अजब फॅशन सेन्समुळे नेटकरी हैराण झालेत. ऑरीने कानात चक्क खिळे घातले आहेत. त्याचा फोटोही व्हायरल झाला.

त्याने कानात दोन खिळे, कानातल्यांसारखे घातले. त्याचा हा अतरंगी फॅशन सेन्स पाहून नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली. तर काहींनी त्याचं कौतुकही केलं.

हा तर उर्फी जावेदचा भाऊच निघाला, अशी कमेंट एका युजरने केली. पोस्टवर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या.

तुला वेदना होत नाहीत का, असाही प्रश्न काहींनी ऑरीला विचारला.

अतिशय कमी वेळातच ऑरीने त्याची वेगळी ओळख निर्माण करत प्रसिद्धी मिळवली. तो बरेच वेळा बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सेलिब्रिटी किड्ससोबत स्पॉट होतो.

ऑरीचे इन्स्टाग्रामवर 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तो सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतो.