10 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या युरोप दौऱ्यावर आहे.
अभिनयासोबतच आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सोनालीने सोशल मीडियावर युरोप व्हेकेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
सोनाली सध्या स्लोव्हेनियातील प्रसिद्ध लेक ब्लेड येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या फोटोंमध्ये ती निसर्गरम्य परिसराचा आनंद घेताना दिसत आहे.
एका फोटोत ती लेक ब्लेडच्या निळ्याशार पाण्यात पोहताना दिसत असून, तिचा लाल मोनोकिनीतील लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
तसेच एका फोटोत सोनाली लाकडी बाकावर निवांतपणे रिलॅक्स करताना दिसते तर दुसऱ्या फोटोत ती तलावाच्या सुंदर दृश्याकडे पाहताना दिसत आहे.