'आईला भिती होती की काजोल मला मारून टाकेल', तनिषा काजोलला घाबरून का असायची?

1 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

काजोल आणि तनिषा मुखर्जी बॉलिवूडमधील लोकप्रिय बहिणी आहेत. या बहिणींमधलं बॉन्डिंग चाहत्यांना खूप भावतं

मात्र लहानपणी काजोल आणि तनिषा एकमेकांशी खूप भांडायच्या

एका मुलाखतीत तनिषाने सांगितलं की तिची आई दोन्ही बहिणींना भांडण्यापासून नेहमी रोखायची, आईला भिती होती की, काजोल तनिषाला मारून टाकेल

मुलाखतीत तनिषाला तिच्या बालपणाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तिने सांगितले की, तिचे पालनपोषण खूप स्ट्रॉंग महिलांनी केलं.

 तनिषा म्हणाली, "माझे पालनपोषण माझ्या आजीने केलं.  मी तीन बहिणींसोबत वाढले"

तनिषाने पुढे सांगितले की,  आई तिची फार काळजी करायची कारण काजोल आणि ती खूप भांडायचे

"काजोल वयाने आणि शारीरिकदृष्ट्याही माझ्यापेक्षा मोठी होती. माझ्या आईला भीती होती की काजोल एक दिवस मला मारेल"

" लहान असताना काजोलचा स्वभाव खूप वाईट होता. माझी आई खूप घाबरायची. त्यामुळे आम्ही दोघी एकमेकांना हात न लावता भांडू शकतो असा नियम होता"

"मला वाटतं की आईने आमच्यासाठी जे केलं ते खूप चांगलं होतं. त्यामुळे काजोल आणि माझ्यातील नातं घट्ट झालं"