'या' सेलिब्रिटींनाही सोसावी लागली 'आर्थिक तंगी' 

17 November 2023

Created By : Manasi Mande

हिट चित्रपट, भरपूर जाहिराती यामुळे सेलिब्रिटींचा बँक-बॅलन्स तगडा असतो. पण काही असे सेलिब्रिटी आहेत ज्यांना आर्थिक तंगीचाही सामना करावा लागला.

 बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री प्रीती झिंटा हिचं या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे.

प्रोड्युसर बनल्यावर इश्क इन पॅरिस हा प्रीतीचा चित्रपट चांगलाच आपटला. तिला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

अनुपम खेर हे उत्तम अभिनेते आहेत. पण चित्रपट प्रोड्युस केल्यावर तेही बँकरप्ट झाले होते.

आर्थिक नुकसान कव्हर करण्यासाठी त्यांनी ॲक्टिंग स्कूल ओपन केले.

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने रा वन चित्रपट बनवण्यासाठी 150 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले.

मात्र बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट आपटल्याने शाहरुखलाही मोठा आर्थिक फटका बसला.

 गोविंदाचे बॉलिवूडमध्ये एक वेगळेच स्थान आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा त्याचा एकही चित्रपट हिट होत नव्हता.

तेव्हा त्याची परिस्थिती खूप वाईट होती.  चित्रपट मिळणंही दुरापास्त झाल्याने त्याच्यावर एकेकाळी खूप कर्ज झालं होतं. सलमान खानने त्याची मदत केली.

मकडी चित्रपटातून अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री श्वेता बसु प्रसादलाही वाईट काळाचा सामना करावा लागला होता.