हिंदी, पंजाबी, इंग्लिशही नाही.. मग विराट कोहलीचं आवडतं गाणं कोणतं ?

1 May 2025

Created By : Manasi Mande

IPL 2025 मध्ये सर्व टीम्स टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी जीव तोडून खेळत आहेत. रोमांचक स्थितीत विराट कोहलीदेखील चर्चेत आहे.

आज विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा वाढदिवस असतो, मात्र ती सध्या मुलांसह लंडनमध्ये आहे, तर विराट हा आयपीएलमुळे भारतात.

याच दरम्यान विराटचा एक इंटरव्ह्यू व्हायरल झालाय, ज्यात त्याला त्याच्या आवडत्या गाण्याबद्दल विचारण्यात आलं होतं.

विराट बऱ्याचदा पंजाबी गाण्यांवर डान्स करताना दिसतो. बऱ्याच वेळा तो जुन्या हिंदी गाण्यांबद्दलही बोलत असतो.

पण सध्या विराटला कोणतंही इंग्रजी, पंजाबी किंवा हिंदी गाणं आवडत नाहीये.

Nee Singam Dhan हे सध्या विराटचं अतिशय आवडतं गाणं आहे. ते एक तमिळ गाणं आहे.

हे गाणं ए.आर.रेहमान आणि Sid Sriram यांनी गायलंय. खरंतर हे  Pathu thala चित्रपटातील गीत आहे.

हा चित्रपट 2023 साली रिलीज झाला, त्यात सिलम्बरासनने काम केलं होतं. या चित्रपटातील गाणं विराटच आवडतं आहे.