तो मूर्ख एका मिशनवर... विराट कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला कोललं !

10 May 2025

Created By : Manasi Mande

क्रिकेटर विराट कोहलीला 'जोकर' म्हटल्यापासून गायक राहुल वैद्य सतत वादाच्या केंद्रस्थानी आहे.

विराटच्या चाहत्यांनी राहुलवर धुवांधार टीका करत त्याला सुनावलंय. पण अजूनही हा विषय थंड झालेला नाहीे.

आता या प्रकरणात विराट कोहलीच्या भावाची रिॲक्शन समोर आली आहे. त्याने राहुलला लूजर म्हणत चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

विकास कोहलीने थ्रेड्सवर राहुल वैद्यबद्दल प्रतिक्रिया दिली, जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

'बाळा, एवढी मेहनत जर स्वत:च्या गाण्यासाठी केलीस,तर कदाचित तू लोकप्रिय गायक बनशील' असं त्याने लिहीलं.

' भारत-पाक तणावामुळे देश चिंतेत आहे. पण विराटचं नाव घेऊन फेमस कसं होता येईल या मिशनमध्ये हा मूर्ख मनुष्य बिझी आहे.  किती मोठा लूझर आहे!' असं त्यांनी पुढे लिहीलं.  

विराटने राहुलला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं, त्यावरूनच गायकाने त्याच्यावर टीका केली होती. विराटच्या चाहत्यांनी त्याला बरंच सुनावलं.