भारताने वर्ल्डकप जिंकू नये, अशी दुवा मागणारी ही पाकिस्तानी अभिनेत्री कोण ?

17 November 2023

Created By : Manasi Mande

पाकिस्तानी अभिनेत्री सहर शिनवारी सध्या बरीच चर्चेत आहे. ट्विटरवरून ती भारतीय टीमविरोधात खूप द्वेष पसरवते. (photo : social media)

15 नोव्हेंबरला सेमीफायनलमध्ये भारतने न्युझीलंडविरोधात विजय मिळवला. ही गोष्ट काही सहरच्या पचनी पडली नाही आणि तिने ट्विटरवरूनही त्याचे प्रदर्शन केले.

वर्ल्डकप 2023 च्या सुरूवातीपासूनच सहर ही भारतीय टीम विरोधात काही ना काही लिहीत आहे. आता भारताने वर्ल्डकप जिंकू नये अशी दुवा तिने मागितली आहे.

तेव्हापासूनच अनेकांना हा प्रश्न पडलाय की ही सहर शिनवारी आहे तरी कोण आणि तिच्या बोलण्याला एवढं महत्व तरी का मिळतंय ?  

सहर ही अभिनेत्री, टिकटॉक स्टार असून तिच्या व्हिडीओमुळे तिचे हजारो चाहते आहेत. सोशल मीडियासोबतच ती अनेक जाहिरातींमध्येही दिसते.

नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 वर्ल्डकप सुरू असताना ती लाइमलाइटमध्ये आली. झिम्बाब्वे विरोधातील मॅचदरम्यान भारत हरला तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन अशी घोषणा तिने केली होती.

सहरचा जन्म पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये झाला. तिने एका कॉमेडी शोमधून अभिनयाची सुरूवात केली. विवादास्पद ट्वीट्स आणि वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते.