मी एक भ्रष्ट गुजराती ब्राह्मण, अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ ( Photo : Instagram)

6 May 2025

Created By : Manasi Mande

स्टाईल, थ्री इडियट्स आणि गोलमाल सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला शर्मन जोशी बराच लोकप्रिय आहे. नुकताच तो सिकंदरमध्ये दिसला होता.

नागपूरमध्ये 1979 साली जन्मलेला शर्मन हा प्रसिद्ध गुजराती थिएटर आर्टिस्ट अरविंद जोशी यांचा मुलगा. त्याचे सासरे म्हणजे प्रसिद्ध अभिनेते प्रेम चोप्रा.

गुजराती ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या शर्मनच्या घरात अनेक कलाकार आहेत. त्याचे काका प्रवीण जोशी आणि काकू सरिता जोशीही थिएटर आर्टिस्ट आहेत.

शर्मनची बहीण मानसी  ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून आणि अभिनेता रोहित रॉयचं तिच्याशी लग्न झालंय. तर केतकी दवे, पूर्वी जोशी आणि पूनम जोशी त्याच्या बहिणी आहेत.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शर्मन जोशीने थिएटरद्वारे करिअरची सुरूवात केली. गॉडमदर चित्रपटाद्वारे 1999 साली त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

2001 साली स्टाईल चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या शर्मन जोशीने 2000 साली प्रेरणा चोप्राशी लग्न केलं. ती अभिनेता प्रेम चोप्रा यांची मुलगी आहे.  

असलेल्यातीन मुलांचा बाप असलेल्या शर्मन एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला की तो स्वत:ला 'भ्रष्ट'गुजराती ब्राह्मण मानतो. कारण त्याने आयुष्यभर मांसाहारी जेवणाचे सेवन केलं.

शर्मन मजेत पुढे म्हणाला की, माझे वडील मला भ्रष्ट करण्यास जबाबादार आहेत. त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते स्वयंपाक करायचे, त्यांना खूप आनंद मिळायचा.