औरंगजेब सतत का विणकाम करत असायचा? छावामध्येही दाखवला हा सीन

22 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

छावा चित्रपटातील औरंगजेबाचं पात्र असो किंवा तानाजीमधील; दोन्ही चित्रपटांमध्ये क्रूर मुघल बादशहा काहीतरी विणताना दिसतो.

इतिहासकार म्हणतात की इस्लाममध्ये टोपी घालण्याची परंपरा आहे

औरंगजेब हा हाताने विणलेलीच टोपी घालायचा

असा दावा केला जातो की औरंगजेब स्वतःची टोपी हाताने विणत असे. यातून उत्पन्नही मिळत होते

औरंगजेबाने टोप्या शिवून मिळवलेले पैसे त्याच्या अंत्यविधीसाठी वापरल्याचा दावाही केला जातो.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात, औरंगजेबाने टोपी विणकामाची व्याप्ती वाढवली होती.  तो आपला बहुतेक वेळ विणकामातच घालवत असे

इस्लाममध्ये टोपी घालण्याची परंपरा खूप जुनी आहे आणि औरंगजेबाचा इस्लामबद्दलचा दृष्टिकोन कट्टर होता.

टोपीकडे धार्मिकता आणि इस्लामिक परंपरांचे पालन करण्याचे प्रतीक म्हणून पाहिले जातं