चहलची टीम हरताच एक्स वाईफ धनश्रीने केलं सेलिब्रेट
4 June 2025
Created By : Manasi Mande
कालच्या सामन्यात आरसीबीने IPL 2025च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव झाला.
विराट कोहली आणि आरसीबीचे चाहते 18 वर्षांपासून या क्षणाची वाट पहात होते. अखेर 18 नंबरला 18 व्या सीजनमध्ये ट्रॉफी मिळालीच.
इकडे विराट कोहलीची टीम जिंकल्यावर तिथे युजवेंद्र चहलच्या एक्स वाईफने, धनश्रीने जोरदार सेलिब्रेशन केलं.
धनश्री वर्मा आणि चहलचा काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट झाला. दोघांनीही आपल्या आयुष्यात मूव्ह-ऑन केलंय.
विजयानंतर धनश्रीने विराटसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली. Finally no. 18 for 18, विराट कोहली आणि RCBचे अभिनंदन, असं तिने लिहीलं.
धनश्री वर्माचे हे सेलिब्रिशेन पाहून अनेक जण ही स्टोरी री-शेअर करत आहेत. चहल भाई बघ, जखमेवर मीठ चोळत्ये, असं नेटकऱ्यांनी लिहीलं.
धनश्रीने अभिनयाच्या दुनियेत पुढे पाऊल टाकलंय. राजकुमार रावसोबत ती दिसली. सध्या ती परदेशात शूटिंग करत्ये.
चहलद्वारे धनश्री वर्मा ही बराच काळ आरसीबीशी निगडीत होती, आता तिने आरसीबीसाठी केलेली पोस्टही व्हायरल झाली आहे.
हिंदी, पंजाबी, इंग्लिशही नाही.. मग विराट कोहलीचं आवडतं गाणं कोणतं ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा