कोलेजन वाढवण्यासाठी 7 ते 8 रुपयांना मिळणारी ही गोष्ट खा; चेहरा चमकेल

10  February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

कोलेजन हे एक प्रथिन आहे जे शरीरात सर्वाधिक प्रमाणात आढळते. हे सांधे, संयोजी ऊती आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

जर शरीरात कोलेजन कमी झाले तर सांधेदुखी आणि त्वचा सैल होऊ लागते आणि तुम्ही वयाच्या आधी म्हातारे दिसू लागता.

शरीरात कोलेजन कमी होण्यामागील कारणे, धूम्रपान, जास्त साखरेचे सेवन, प्रदूषण, जास्त सूर्यप्रकाश असू शकतात.

शरीरात कोलेजनचे प्रमाण वाढवण्यासाठी बाजारात अनेक पूरक आहार उपलब्ध असले तरी,एका पदार्थाचे सेवन करूनही कोलेजन वाढवता येते.

अंडी कोलेजन वाढवण्यास मदत करतात. यासाठी अंडी खाणे चांगले.

अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेजनची गरजच पूर्ण होते, तसेच ते झिंक, व्हिटॅमिन बी 12, बी कॉम्प्लेक्सचे इतर जीवनसत्त्वेही मिळतात

दररोज एक किंवा दोन अंडी आहारात समाविष्ट केली तर त्वचा, केस निरोगी राहतात, डोळे निरोगी राहतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्नायू आणि हाडे देखील मजबूत होतात.