टेस्टीही, हेल्दीही! ऑफिससाठी नाश्त्याचे भन्नाट पर्याय

22 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

ऑफिसमध्ये मधल्या वेळेला भूक लागल्यावर बिस्किटे, चिप्स आणि नमकीन खाण्याऐवजी हेल्दी स्नॅक्स खा.

भाजलेले काळे चणे प्रोटीनयुक्त असून ते टिफिनमध्ये सहज नेता येतात.

भाजलेले शेंगदाणे देखील चांगला पर्याय आहे, मात्र बाजारातील जास्त मीठ आणि तेल असलेले शेंगदाणे टाळा.

मखाने कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असून ते थोड्या तुपात भाजून खाऊ शकता.

मल्टीग्रेन ब्रेडवर पीनट बटर लावा, त्यावर केळ्याचे काप ठेवा हे तुम्हाला ऊर्जाही देणारा असेल.

व्हेजिटेबल सँडविच ऑफिससाठी सोपे आणि चविष्ट स्नॅक आहे.