23 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात कलिंगडचं सेवन केलं जात. कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं जे शरीर हायड्रेट ठेवतं. तसेच कलिंगडमध्ये अनेक जीवनसत्वे असतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्व असतं. त्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. तसेच त्वेचसंदर्भात समस्या कमी होतात.
कलिंगडमध्ये क जीवनसत्व असतं, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. व्हीटामीन सी आजारापासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरतं.
कलिंगडमध्ये व्हीटामीन बी 6 असतं, जे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. बी 6 मूड सुधारण्यास आणि ऊर्जा कायम राखण्यात प्रमुख भूमिका बजावतो.
कलिंगडमध्ये लायकोपीन नावाचं एन्टीऑक्सीडेंट असतं, ज्यामुळे हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते, असं म्हटलं जातं.
कलिंगडमध्ये पोटॅशियम असतं. पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर ठरतो.
कलिंगडमध्ये पाण्यासह मिनरल्सचा समावेश असतो, जे शरीर थंड ठेवण्यात फायदेशीर ठरतं.